निखिल वैरागर दिग्दर्शित 'आंबट शौकिन'सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. अवघ्या चार दिवसामध्ये या सिनेमाच्या ट्रेलरला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. आज या ट्रेलरच्या व्ह्युजचा आकडा 536,823 आहे.  या सिनेमामध्ये  पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर,  मोनालिसा बागल, अमेय वाघ, अक्षय टंकसाळे सारखे कलाकार झळकणार आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाचं आभासी जग आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक गुंतागुंत तसेच या तिघांच्या ‘आंबट’ स्वभावामुळं त्यांच्या जीवनात आलेलं भावनिक वादळ यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 

आंबट शौकिन ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)