अभिनेता शाहरुख खान याच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर जमलेल्या गर्दीतून 2 नोव्हेंबर रोजी चोरीस गेलेल्या मोबाईल प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम जमनाप्रसाद, मोहम्मद अली आणि इम्रान अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर मोबाईल चोरीचा आरोप आहे. दोन नोव्हेंबर रोजी एकाच ठिकाणी जमलेल्या गर्दीतून तब्बल 30 मोबाईल चोरीला गेले होते. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ मोबाईल हस्तगत केले आहेत.

शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याची एक झलक पाहण्यासाठी तेथे जमलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. अनेकांचे मोबाईल चोरीला गेले. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीसांनी यापूर्वीच दिली होती.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)