बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवणारी प्रियांका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. देसी गर्लचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या अॅक्शनपॅक मालिकेची वाट पाहत आहेत. सध्या प्रियांका तिच्या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ज्यासाठी ती दररोज मुलाखती देताना दिसत आहे.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्रा म्हणाली, 'मला असे वाटते की पुरुषांनी स्वातंत्र्याचा आणि कमावणारे, कुटुंबाचे नेते असल्याच्या अभिमानाचा आनंद लुटला आहे. परंतु एखाद्या स्त्रीने असे केल्यास, एखादी स्त्री अधिक यशस्वी झाल्यास किंवा एखादा पुरुष घरी राहत असेल आणि घरातील महिला कामावर जात असेल तर ही बाब पुरुष जातीसाठी धोक्याची ठरते. परंतु आपण आपल्या मुलांना हे शिकवले पाहिजे की रडण्यात लाज नाही. त्यांना हे सांगितले पाहिजे की त्यांनी आपली बहीण, आई, मैत्रीण किंवा पत्नीला स्पॉटलाइट देण्यास, त्यांना संधी देण्यास सक्षम असायला हवे. माझ्या वडिलांनी माझ्या आईशी तेच केले. आता जेव्हा मी माझ्या पतीसोबत रेड कार्पेटवर चालते आणि तो बाजूला होऊन मला स्पॉटलाइट देतो, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो की मी अशा लोकांमध्ये आहे ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची असुरक्षितता नाही.' (हेही वाचा: Madhuri Dixit Buys New Car: माधुरी दीक्षितने 3.08 कोटी रुपयांची नवीन पोर्श कार केली खरेदी, पाहा फोटो)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)