प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि ग्राफिक डिझायनर साबू प्रवदास यांचं निधन झालंय. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासुन ते जीवनाशी झुंज देत होते. पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पहाटे त्यांना कारने धडक दिली होती. त्यामुळे तिरुवअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. केरळीयम कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात तिरुअनंतपुरम सबु आले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना गाडीने त्यांना धडक दिली.
पाहा पोस्ट -
Malayalam art director Sabu Pravadas passes away following injuries in a road accident https://t.co/oyVK3O35l2 pic.twitter.com/lbOiwamdha
— OrbView (@OrbView) October 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)