Maharashtra CM Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथ विधी सोहळा सुरु झाला. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनके व्हीव्हीआयपी आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि अनेक भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री यात सामील होत आहेत.

आझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी समारंभात राजकीय दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गर्दी पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दीक्षित, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि सचिन तेंडुलकर असे अनेक व्हीआयपी पोहोचले आहेत. यासह आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांनीही महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आहे. शपथविधी सोहळ्याला 42,000 लोक उपस्थित आहेत. (हेही वाचा: 'Re-Election' With Ballot Paper In Markadwadi: राष्ट्रवादी-सपा नेते उत्तम जानकर आणि इतर 88 विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल; मरकडवाडी येथे बॅलेट पेपरद्वारे 'पुनर्निवडणूक' घेण्याचा केला होता प्रयत्न)

Maharashtra CM Oath Ceremony:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)