बॉलिवूडची स्पष्टवक्ता कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या विधानांमुळे बऱ्याचवेळा वादात सापडली असेल, परंतु तिचा अभिनय प्रत्येक वेळी लोकांची तोंडे बंद करतो. कंगना तिच्या बोलण्याने आणि कामाने सगळ्यांना चोख प्रत्युत्तर देते. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत चर्चेत होती. या चित्रपटात कंगना स्वतः इंदिरा गांधींची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'चा पहिला टीझर (Emergency Teaser) प्रोमो रिलीज झाला आहे. कंगना पहिल्यांदाच एकटी चित्रपट दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटातून कंगना लीड डायरेक्टरही बनली आहे. मात्र, याआधी तिने मणिकर्णिकामध्ये सहदिग्दर्शक बनून दिग्दर्शनाची कमानही घेतली होती. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. टीझरसोबतच हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Sexy In My Dress Song: नोरा फतेहचं इंटरनॅशनल म्युजिक व्हिडिओ मध्ये पदार्पण, 'सेक्सी इन माय ड्रेस' लवकरच युट्यूबवर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)