आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये या सामन्यासाठी मोठा बदल दिसून आला. टीम इंडियामध्ये दीर्घकाळ आपले स्थान पक्के करणाऱ्या ऋषभ पंतची या हाय व्होल्टेज सामन्यासाठी संघाच्या अंतिम-11 मध्ये निवड झाली नाही. त्याचवेळी, दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंतसोबतच्या वादांमुळे अनेकदा चर्चेत राहणारी उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये दिसली.

काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात एकमेकांचे नाव न घेता सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. यानंतर या सामन्यात उर्वशीचे दर्शन आणि ऋषभ पंत संघात खेळत नसल्याने सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले. याबाबत अनेक मीम्सही व्हायरल झाले असून, उर्वशी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)