Ilayaraja's Daughter Passes Away: दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे. इंडस्ट्रीतील दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांची कन्या प्रसिद्ध गायिका भवतारिणी यांचे 47 व्या वर्षी निधन झाले आहे. भावतारिणी यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अहवालानुसार, भवतारिणी बऱ्याच दिवसांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, भवतारिणी यांच्यावर गेल्या 6 महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. नुकतेच त्या आपल्या जीवघेण्या आजारावर उपचारासाठी श्रीलंकेला गेल्या होत्या, जेथे भवतारिणी यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंडस्ट्रीतील गायिका असण्यासोबतच, भावतारिणी एक अप्रतिम संगीतकार होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी वडील इलैयाराजा, भाऊ कार्तिक राजा आणि युवन शंकर राजा यांच्यासोबत अनेक उत्तम गाणी गायली. (हेही वाचा: Saif Ali Khan Discharged: ट्रायसेप शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)