आज गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलेब्जनी देखील आपल्या घरी गणपतीची मूर्ती स्थापित केली आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता आणि मेहुणा आयुष शर्मा यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले. आज संध्याकाळी सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी एकत्र आरती करून गणपतीचे आशीर्वाद घेतले. यावेळी सलमानसह त्याचे आई-वडील, अभिनेत्री हेलन, भाऊ सोहेल, अर्पिता आणि आयुष उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे यावेळी सलमानची अफवा असलेली गर्लफ्रेंड युलिया वंतूर हीदेखील दिसली. (हेही वाचा: Rohit Sharma Ganesh Chaturthi Celebration: क्रिकेटर रोहित शर्माने साजरी केली गणेश चतुर्थी; मंगलमय प्रसंगाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)