Ganeshotsav 2024: गणेशोत्सव देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. बॉलीवूडचे सुपरस्टार देखील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आतूर असतात. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान(Salman Khan)ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत बहीण अर्पिता खानही(Arpita Khan) होती. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या सोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये, सलमान खान निळा शर्ट आणि मॅचिंग जीन्स घातलेला दिसत आहे. इतर फोटोंमध्ये सीएम शिंदे सलमानला गणेशमूर्ती आणि पुष्पगुच्छ सादर करताना दिसत आहेत. फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सलमान खान, अर्पिता खान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)