आदित्य ठाकरेच्या माध्यमातून बाळासाहेबांचा नातू राजकारणात आला आहे. या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान ठाकरे घराण्यातील एक चेहरा आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

ऐश्वर्य ठाकरे आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. येत्या काही महिन्यात याबाबतची एक मोठी घोषणा होऊ शकते. काही मोठे निर्माते ऐश्वर्यसोबतच्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)