Arijit Singh Pune Concert: लोकप्रिय गायक अरिजित सिंग मार्च 2025 मध्ये पुन्हा एकदा पुण्यात आपली कला सादर करणार आहे. या भव्य कार्यक्रमाद्वारे, अरिजितची जादू थेट स्टेडियमवर अनुभवण्याची एक अनोखी संधी चाहत्यांना मिळणार आहे. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो असे आयोजकांचे म्हणणे आहे. हा कार्यक्रम 16 मार्च रोजी एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. एखाद्या स्टेडियमवर होणारा पुण्यातील पहिला कार्यक्रम असणार आहे. साधारण 35,000 हून अधिक संगीत रसिक व चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, असा विश्वास आहे.
2BHK Alfresco चे ब्रँड मालक डॉ. हेरंब शेळके म्हणाले, आम्हाला पूर्वी कलाकारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता, पण यावेळची वेळ वेगळी असेल. प्रचंड मागणीमुळे, आम्ही अरिजितच्या कार्यक्रमासाठी एक स्टेडियम बुक केले आहे. यामुळे ट्रॅफिक, पार्किंग किंवा इतर कोणतीही आव्हाने नसतील. हा कार्यक्रम एक संस्मरणीय अनुभव बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, कारण हा पुण्यातील पहिलाच स्टेडियम शो आहे. (हेही वाचा: Coldplay Mumbai Concert: Chris Martin मुंबई मध्ये दाखल)
Arijit Singh Pune Concert:
Over 35,000 fans, one legendary artist. Pune’s first-ever Arijit Singh concert is the talk of the town. Be there or miss out! #ArijitSinghInPune pic.twitter.com/GXvrauI91T
— Ishika (@Sanskari_Girll) January 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)