सोशल मीडिया सेन्सेशन अपूर्वा मुखिजा काही दिवसांपूर्वी इंडियाज गॉट लेटेंट शोमधील तिच्या विधानांमुळे चर्चेत होती. या शोमध्ये कमेंट केल्यानंतर अपूर्वावर बरीच टीका झाली. इंस्टाग्रामवर रिबेल किड म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अपूर्वा मुखिजा पुन्हा एकदा तिच्या वागण्याने चर्चेत आली आहे. सबरीना कारपेंटरचा तिच्या पॅरिस कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामधील अपूर्वाचे वागणे अनेकांना खटकले आहे. अपूर्वाचा एक व्हिडिओ रेडिट वापरकर्त्याने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या फोनच्या फ्लॅश लाईटने स्वतःचे रेकॉर्डिंग करताना दिसत आहे. तसेच तिने गर्दीत आपल्या वागण्याने लोकांना कॉन्सर्ट पाहण्यात व्यत्यय आणला.

तिने अगदी स्टेजजवळील पायऱ्यांवर कॉन्सर्टचे आणि स्वतःचे व्हिडिओ व रील बनवले. जेव्हा अपूर्वा तिच्या जागेवरून उठून स्टेजवरील पायऱ्यांवर उभी राहून फोटो काढत होती आणि व्हिडिओ बनवत होती, तेव्हा कॉन्सर्टच्या सुरक्षा रक्षकाने तिला लाईटचा फ्लॅश दाखवून दूर जाण्यास सांगितले. यानंतरही अपूर्वाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि फोटो आणि व्हिडिओ बनवत राहिली. ती इकडे तिकडे फिरत असल्याने सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला आणि तिला निघून जाण्यास सांगितले गेले. तिचे असे वागणे पाहून इतर लोक खूप नाराज झाले आणि त्यांनी तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मिडियावरही अपूर्वावर मोठी टीका होत आहे. (हेही वाचा: Guns N Roses Mumbai Concert: प्रसिद्ध अमेरिकन बँड ‘गन्स एन रोझेस’ 17 मे रोजी मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्स करणार; तिकीट विक्री सुरु, जाणून घ्या दर)

Apoorva Mukhija Creates Ruckus at Concert:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)