
जानेवारी 2025 मध्ये, प्रसिद्ध बँड 'कोल्डप्ले' ने भारतात लाईव्ह कॉन्सर्ट सादर केला. अलीकडेच कॅनेडियन आंतरराष्ट्रीय पॉप गायक शान मेंडिसने मुंबईत सादरीकरण केले. आता भारतीय संगीत प्रेमींसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आणखी एक प्रसिद्ध बँड भारतात लाईव्ह कॉन्सर्ट सादर करण्यास सज्ज झाला आहे. अमेरिकन बँड ‘गन्स एन रोझेस’ने (Guns N' Roses) भारतात लाईव्ह परफॉर्मन्सची घोषणा केली आहे. आपल्या आशिया दौऱ्याचा भाग म्हणून 12 वर्षांनंतर हा बँड भारतात परतत आहे. येत्या 17 मे 2025 रोजी मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स येथे त्यांचा हा कार्यक्रम होणार आहे.
'गन्स एन रोझेस' या कार्यक्रमाची तिकिटे 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजल्यापासून बुकमायशोवर अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली. याआधी कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून बुकमायशोवर प्री-सेल तिकिटे उपलब्ध झाली होती. याआधी 2012 मध्ये गन्स एन रोझेसने बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथे कार्यक्रम सादर केले होते. आता इतक्या वर्षांनी त्याच्या पुनरागमनाने चाहते खूप आनंदी आहेत. या संगीत कार्यक्रमाला या वर्षातील सर्वात मोठ्या रॉक कार्याक्रमापैकी एक मानले जात आहे.
Guns N Roses Mumbai Concert:
View this post on Instagram
या कार्यक्रमासाठी सामान्य प्रवेश तिकिटे 4,499 पासून सुरू होत आहेत, पुढे व्हीआयपी 10,999 आणि त्याहून अधिक, कोटक लाउंज आणि प्लॅटिनम लाउंज 28,999 आणि त्याहून अधिक, अर्ली एन्ट्री पॅकेज 19,240, प्रीमियम अर्ली एन्ट्री व्हीआयपी 31,320 आणि अल्टिमेट व्हीआयपी एक्सपिरीयन्स 1,15,425 असे तिकीट दर आहेत. बुकमायशोनुसार, एका व्यक्तीला या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दहा तिकिटे बुक करता येतात. अॅक्सल रोज हे डग मॅककेगन आणि स्लॅश यांच्यासोबत भारतात सादरीकरण करणार आहेत. स्लॅशने 1996 मध्ये बँड सोडला पण 2016 मध्ये तो परतला. (हेही वाचा: Ed Sheeran’s Bengaluru Street Performance: बेंगळुरूमध्ये फुटपाथवर गात असलेल्या गायक 'एड शीरन'चा परफॉर्मन्स पोलिसांनी मधेच थांबवला; निघून जाण्यास सांगितले, व्हिडीओ व्हायरल)
दरम्यान, 1987 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला अल्बम 'Appetite for Destruction' हा खूप यशस्वी ठरला, ज्यामध्ये ‘Sweet Child o' Mine’, ‘Welcome to the Jungle’, आणि ‘Paradise City’ अशी हिट गीते समाविष्ट होती. पुढे 1991 मध्ये त्यांनी दोन डबल अल्बम्स, 'Use Your Illusion I' आणि 'Use Your Illusion II', प्रदर्शित केले, ज्यामध्ये ‘November Rain’ आणि ‘Don't Cry’ सारखी गीते होती. गन्स एन' रोझेस आजही जागतिक स्तरावर त्यांच्या संगीताने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि रॉक संगीताच्या इतिहासात आपले स्थान कायम ठेवले आहे.