Drishyam 2 Teaser Out: अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'दृश्यम 2' चा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये 'दृश्यम' चित्रपटातील काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत आणि शेवटच्या भागात दुसऱ्या भागाची झलक आहे. ज्यामध्ये अजय आपला कबुलीजबाब नोंदवताना दिसत आहे. विजय साळगावकर आपल्या गुन्ह्याची कबुली देणार की, त्याचे रहस्य दडपून राहणार? या प्रश्नाचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
याआधी निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्त मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Vijay aur uske parivaar ki kahaani toh yaad hogi na aapko? Ki yaad dilaye? #Drishyam2 in cinemas on 18th November, 2022.#Tabu #AkshayeKhanna @shriya1109 #RajatKapoor @ishidutta #MrunalJadhav @AbhishekPathakk @KumarMangat pic.twitter.com/LlUuS9x4Kn
— Ajay Devgn (@ajaydevgn) September 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)