भाभीजी घर पर है मधील मलखान या भूमिकेने प्रसिद्धी मिळविणारा अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले. ही बातमी केवळ त्याच्या चाहत्यांनाच नाही तर इंडस्ट्रीतील त्याच्या सहकाऱ्यांनाही धक्का देणारी होती. टेलिव्हिजन अभिनेत्री कविता कौशिकने इंस्टाग्रामवर जाऊन दीपेशच्या निधनाची पुष्टी केली. तिने इंस्टाग्रामवर याबाबत नोट लिहिली. दीपेश भान टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने 'कॉमेडी का किंग कौन, कॉमेडी क्लब, भूतवाला, एफआयआर, चॅम्प आणि सुन यार चिल मार यासह अनेक शोमध्ये काम केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)