जगदीश प्रताप बंदरी याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 'पुष्पा' या ब्लॉकबस्टर चित्रपटात जगदीश अल्लू अर्जुनसोबत दिसला आहे. या चित्रपटात त्यांनी केशवची भूमिका साकारली होती. 30 वर्षीय जगदीश प्रताप एका ज्युनियर आर्टिस्टसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या महिलेने 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. महिलेच्या मृत्यूसाठी मृताच्या कुटुंबीयांनी जगदीशला जबाबदार धरले आहे. तक्रार आणि तपासाच्या आधारे जगदीशला बुधवारी कलम 306 अन्वये अटक करण्यात आली. (हे देखील वाचा: Fighter Teaser: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलिज होणार हृतिक रोशनच्या 'फाइटर' चित्रपटाचा टीझर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)