Fighter Teaser: बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) च्या आगामी 'फायटर' (Fighter) या सिनेमाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अलीकडेच या चित्रपटातील हृतिक रोशनसह सर्व स्टारकास्टचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहेत. हे पाहिल्यानंतर 'फायटर'साठी चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी आता 'फायटर'च्या टीझरची (Fighter Teaser) रिलीज डेट जाहीर केली आहे. 'फायटर'च्या फर्स्ट लूक पोस्टर्सच्या चर्चेदरम्यान, निर्मात्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर 'फायटर'च्या टीझरसंदर्भात एक घोषणा व्हिडिओ शेअर केला. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीझर रिलीजवर एक अपडेट दिले जात आहे. त्यामुळे हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर 8 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. (वाचा- Fighter Movie Anil kapoor Look: 'फाइटर' चित्रपटातील अनिल कपूरचा दमदार लूक आऊट)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)