झोमॅटो डिलिव्हरी बॉय (फोटो सौजन्य- ट्विटर)

सध्या बदलत्या काळामुळे सर्व गोष्टी घर बसल्या हाताशी आणून मिळत आहे. तसेच विविध प्रकारच्या ऑनलाईन पद्धतीने घरातील खाण्यापासून ते इतर गोष्टी सर्व उपलब्ध झाल्या आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाण ऑर्डर करता त्यातील अन्न खाऊन तुम्हाला दिलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

झोमॅटो (Zomato) कंपनी ही ऑनलाईन पद्धतीने फूडची विक्री करते. त्याचबरोबर ग्राहकांना ऑर्डर केलेल्या फूडवर सूट आणि ऑफर्स ही देते. मात्र तुम्ही ऑर्डर केलेले खाणं खाऊन पुन्हा त्याच अवस्थेत ठेवल्याचा प्रकार एका डिलिव्हरी बॉयने केला आहे. या डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी करणारा तरुण पॅकिंग केलेले अन्न काढतो. त्यानंतर त्यातील अन्नाचे काही खास खाऊन पुन्हा ज्या पद्धतीने पॅकिंग केले होते त्या पद्धतीने ठेवत असल्याचा तरुणाचा प्रताप उघडकीस आला आहे. या प्रकरणी नेटकऱ्यांनी झोमॅटोवर टीका केली आहे. त्यावर झोमॅटोने माफी मागत या पुढे अशी घटना होणार नाही याची दखल घेऊ असे सांगितले आहे.