जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती (World's Oldest Man) मसाजो नोनाका (Masazo Nonaka) यांचं वयाच्या 113 व्या वर्षी निधन झालं आहे. मूळचे जपानी (Japan) असलेल्या मसाजो नोनाका यांचं रविवारी निधन झाल्याची माहिती जपानी मीडियाने दिली आहे. 1905 साली जन्म झालेल्या नोनाका यांचं नाव जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं होतं.राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Born in 1905, Masazo Nonaka was the world's oldest man. https://t.co/eJLxqQLUzj
— Twitter Moments (@TwitterMoments) January 20, 2019
मसाजो नोनाका यांच्या बाबत काही खास गोष्टी
- अल्बर्ट आईंस्टाईन यांच्या theory of relativity च्या काळात मसाजो यांचा जन्म झाला होता.
- नोनाका यांना सहा भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांचं लग्न 1931साली झालं. त्यांना पाच मुलं आहेत.
- मसाजो नोनाका जपानमधील टोकियो शहरात हॉटेल चालवत असत.
- कामामधून निवृत्ती घेतल्यानंतर मसाजो यांना टीव्हीवर सुमो पेहलवानांची कुस्ती पाहण्यात विशेष रस होता.
जपानमध्ये अनेक लोकांच्या नावावर सर्वात वृद्ध व्यक्तीचा विक्रम आहे. यापूर्वी 2013 साली जिरोमोन किमुरा या जपानी व्यक्तीने 116 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला तर 1997 साली 122 वर्षीय जपानी व्यक्ती जीन लुईस यांच्या नावावरही हा विक्रम होता.