महागड्या, लक्झरी वस्तूंचे प्रत्येकालाच आकर्षण असते. आपल्याकडे सर्व काही ब्रँडेड असावे, असे अनेकांना वाटत असते. सेलिब्रेटींच्या ब्रँडेड, स्टायलिश, महागड्या वस्तू सामान्यांना भारावून टाकतात. पण 123 कोटींची सँडल देखील उपलब्ध आहे, असे कोणी सांगितले तर.... अनेकांनाच तर यावर विश्वासच बसणार नाही. पण 1.7 कोटी डॉलरचा सँडल युएईमध्ये बनवण्यात आली आहे. ही सँडल बनवण्यासाठी सुमारे 9 महिने लागले आहेत.
वृत्तानुसार, ही सँडल हिरे आणि सोन्याने बनवली आहे. ही सँडल युएईचा ब्रँड जदा दुबई यांनी पॅशन ज्वेलर्ससह ही सँडल बनवली आहे. ही सँडल 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये सादर करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी हॉंगकॉंगमध्ये Macallan व्हिस्की येथे ही लिलावासाठी ठेवण्यात आली होती. Macallan व्हिस्कीची किंमत 5 कोटी ठेवण्यात होती.
यापूर्वी 2014 मध्ये हॉंगकॉंगमध्ये मैकालन एम इम्पीरिअल ब्रॅंड ठेवण्यात आला होता. तिथे 6 लीटर माल्ट व्हिस्कीची बॉटल 6 लाख 28 हजार 205 डॉलरला खरेदी केली गेली.
2010 मॅकालन एम इम्पीरियल ब्रॅंडच्या माल्ट व्हिस्कीचा लिलाव न्यूयॉर्कमध्ये झाला. ती बॉटल 4 लाख 60 हजार डॉलर्सला एका व्यक्तीने खरेदी केली.