अंड्याची कमाल, जगप्रसिद्ध सेलिब्रिटी कायली जेनर हिला मागे टाकत इन्स्टाग्रामवर मिळवले चक्क 2.5 कोटी लाईक्स
Kylie Jenner and World Record Egg | (Image courtesy: Archived, edited, representative)

World Record Egg: लाईक, कमेंट आणि शेअर ही सोशल मीडियावर व्यक्तीची लोकप्रियता तपासण्याचे एकमेव परिमाण. हेच परिमान लावत सोशल मीडियावर चक्क एक अंडे स्टार (Trending on Instagram) झाले आहे. या अंड्याची खरी चर्चा तर तेव्हा सुरु झाली जेव्हा, या अंड्याने हॉलीवुड अभिनेत्री आणि जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कायली जेनर (Kylie Jenner) हिला मागे टाकले. वर्ल्ड रेकॉर्ड नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर या अंड्याचा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोला अतापर्यंत 2.5 कोटी पेक्षाही अधिक लाईक मिळाले आहेत. तर, कायली जेनर हिने गेल्या वर्षी तिच्या मुलीचा फोटो शेअर केला होता. या फोटोला 1.80 लाईक मिळाले होते. वय वर्षे अवघे 21 असलेली कायली 6,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत जगातील 5 व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत सेलेब्रिटी आहे.

2.5 कोटी पेक्षाही अधिक लाईक्स मिळवत जागतिक विक्रम करणाऱ्या या अंड्याचा फोटो @world_record_egg ने पोस्ट केला होता. विशेश म्हणजे या पेजवर आतापर्यंत केवळ एवढा एकच फोटो पोस्ट करण्यात आला आहे आणि या पहिल्याच फोटोला इतके लाईक्स मिळाले आहेत. या अकाऊंटे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्सही आहेत.

अंड्याचा फोटो पोस्ट करत @world_record_egg पेज अकाऊंट होल्डरने हा फोटो बजफीड, डेलीमेल, सीएनएन, प्यूडायफाय, द सन, द एलन शो, यांसारख्या मोठ्या बेबसाईट्सनाही टॅग केला होता. हा फोटो पोस्ट करत त्याने कायली जेनर हिलाही चॅलेंज केले होते. अकाऊंट होल्डरने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'या फोटोला लाईक करुन जागतिक विक्रम करुया. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक ठरलेला फोटो हा नवा विक्रम करुया'. महत्त्वाचे म्हणजे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक झालेला फोटो ठरण्याचा मान कायली जेनर हिच्या नावावर आहे. जो या अंड्याने मोडला. (हेही वाचा, लग्नात लाखो रुपये देऊन केक कापला, अशी झाली फजिती की...)

दरम्यान, फेब्रुवारी 2018मध्ये कायलीने आपल्या मुलीचा फोटो शेअर करत पोस्ट लिहीली होती की, 'चला एक विश्वविक्रम बनवू या. या फोटोला जगातील सर्वाधिक लाईक मिळवलेला फोटो बनवूया.' मजेशीर असे की, अंड्याने केलेला विक्रम पाहून कायलीने प्रतिक्रीया दिली आहे. कायलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती रस्त्यावर अंडे फोडताना दिसत आहे.