लग्नातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनविण्यासाठी लोक काय काय करतील याचा नेम नाही. तर लग्नसोहळ्यात होणाऱ्या खर्चापेक्षा तो अधिक उत्तमरित्या कसा साजरा केला जाईल याकडे सर्वजण लक्ष देतात. परंतु काही वेळेस अतिघाई त्याला संकटात नेई अशी एक म्हण आहे. त्यानुसार लग्नसोहळ्याच्या वेळी लाखोंचा जरी पैसा देऊन यामधील महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास तुमची चांगलीच फजिती होऊ शकते. अशाच प्रकराचे एक लग्न सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनला आहे.
फिलिपिन्स (Philippines) येथे मनीलामधील एक प्रेमी युगलाने लग्नबंधनात अडकणार होते. तसेच मीडियाच्या रिपोर्टनुसार, शाइन तमायो आणि त्याची प्रेयसी जॉन चेन यांनी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडावा असे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी लग्न सोहळ्याची तयारी करण्यास सुरुवात केली. तसेच लग्नात मंडळींना उत्तम प्रकारचे जेवण मिळावे यासाठी तब्बल 5 लाख रुपये ही खर्च केले. परंतु एवढा खर्च करुनही त्यांच्या माथी निराशाच आली आहे. कारण कॅटरिंगवाल्याने लाखो रुपये घेऊन ही लग्नातील मंडळींना जेवणच दिले नाही. या प्रकरणी नवविवाहीत दांपत्याला लग्नातील मंडळींसमोर लाज वाटल्याने त्याने रस्त्यावरील जेवण मंडळींसाठी ऑर्डर केले.
परंतु या लग्नातील गमतीशीर किस्सा तर जेवण झाल्यानंतर लग्नाच्या वेळचा केक कापताना झाला आहे. या कपल्सने कॅटरिंगवाल्याकडूनच केक ऑर्डर केला होता. राजेशाही प्रमाणे दिसणारा हा केक कापण्यास हे कपल्स पुढे गेले आणि तो केक थर्मोकोलचा निघाल्याचा भयंकर विचित्र प्रकार घडला. या प्रकरणी संतापलेल्या नवविवाहित दांपत्याने लगेच पोलिसात धाव घेऊन कॅटरिंगवाल्यावर गुन्हा दाखल केला. तसेच नवविवाहित वधूने तर आयुष्यातील सर्वात खराब दिवस असल्याचे म्हटले आहे.