भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यापासून ते आज अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमापर्यंत रेडिओची जादू टिकून आहे. रेडिओचं हेच महत्त्व ओळखून 9 वर्षांपासून जगभरात 13 फेब्रुवारी हा दिवस 'वर्ल्ड रेडिओ डे' म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने यंदा पद्मश्री पुरस्कार विजेते सुदर्शन पटनायक(Sudarshan Pattnaik) यांनी पुरी येथील समुद्रीकिनारी एक सुंदर वाळूशिल्प साकारले आहे. यामध्ये त्यांनी जागतिक रेडियो (World Radio Day) दिनाच्या शुभेच्छा देतानाच त्यात नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात या कार्यक्रमाची देखील झलक दाखवली आहे. वाळूपासून मोदींची प्रतिकृती साकारताना त्यांनी मन कि बात हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असल्याचे म्हंटले आहे. World Radio Day 2020: जगभरात का साजरा केला जातो वर्ल्ड रेडिओ दिवस? जाणूया घ्या याचा इतिहास
नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2014 मध्ये निवडून आल्यावर आणि पंतप्रधान पदाची धुरा सांभाळल्यावर मन की बात हा कार्यक्रम सुरु केला होता, त्यांनतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिनाभरातील घटनांवर आधारित मन की बात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधत मोदींनी आजवर स्वच्छ भारत, प्लास्टिक हटाव, पाणी वाचवा यासारख्या अनेक मुद्द्यांना समोर आणले आहे. यावेळेस सुद्धा 23 फेब्रुवारी रोजी मन की बात कार्यक्रम घेण्यात येईल, आकाशवाणी वरून हा कार्यक्रम प्रदर्शित केला जात असल्याने डिजिटल जगात रेडियोचे महत्व वाढण्यास काहीशी मदत झाली आहे, किंबहुना म्ह्णूनच सुदर्शन यांनी या कार्यक्रमाची झलक दाखवत आजच्या रेडियो दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा रेडियो डे स्पेशल वाळू शिल्प
Greetings on #WorldRadioDay: My SandArt on Hon’ble PM @narendramodi Ji’s popular monthly radio broadcast #MannKiBaat at Puri beach, #Odisha. pic.twitter.com/9kzItDONmZ
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) February 13, 2020
यापूर्वी सुद्धा अनेकदा सुदर्शन यांनी अशाच प्रकार विविध प्रसंगावर वाळूशिल्पातून आपल्या अनोख्या कलांचे दर्शन घडवले आहे. काही महिन्यांपूर्वी दक्षिणेकडील राज्यांमध्ये फनी (cyclone Fani) वादळामुळे सगळीकडे गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी सुद्धा नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देत सुदर्शन यांनी वाळूशिल्प साकारले होते, याशिवाय अनेक सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सुद्धा सुदर्शन या शिल्पांच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा देत असतात.