Women Group Danced in Delhi Metro: एवढचं पाहायचं राहिलं होतं! दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा ग्रुप डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ
Women Group Danced in Delhi Metro (PC - X/@prof_desi)

Women Group Danced in Delhi Metro: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका दिवसात 10 व्हिडिओ व्हायरल झाले तर त्यापैकी 2-3 व्हिडिओ तुम्हाला दिल्ली मेट्रोचेच (Delhi Metro) दिसतील. दिल्ली मेट्रोतील विविध प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओंमध्ये लोक जागांसाठी भांडण करताना दिसत आहेत तर काहींमध्ये ते विचित्र कृत्य करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर काही मुलं-मुली मेट्रोमध्ये रील बनवतानाही दिसतात. हे सर्व सुरू असतानाच महिलांनी आपल्या मनोरंजनासाठी मेट्रोमध्ये नाचण्यास सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेट्रोच्या शेवटच्या कोचचा एक व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिला गाताना आणि नाचताना दिसत आहेत. त्यांच्या ग्रूपमधील आणखी काही महिला खाली जमिनीवर बसून त्यांचा हा डान्स पाहत आहेत. मेट्रोमध्ये उपस्थित असलेले सर्व प्रवासी त्या महिलांना नाचताना पाहत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Woman Enters Delhi Bus Wearing A Bikini: काय सांगता? फक्त बिकिनी घालून महिलेने केला दिल्लीच्या बसमधून प्रवास; व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

व्हायरल व्हिडिओ पहा -

हा व्हिडिओ X वर @prof_desi नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना या यूजरने 'दिल्ली मेट्रोमध्ये तुमचे स्वागत आहे' असे कॅप्शन दिले आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ 5 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले - व्वा, आता तीही स्पर्धेत उतरली आहे. आणखी एका यूजरने लिहिले - दिल्ली मेट्रो ही कॉमेडी आहे. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले - येथे सर्व काही शक्य आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले - हे एवढेचं बाकी होते.