पतीच्या 'X' Premium वरून पत्नीचा झाला गैरसमज; पतीने ट्वीट करत शेअर केला धम्माल प्रसंग
Husband Wife Relationship | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काही दिवसांपूर्वीच ट्वीटरचं (Twitter) नाव बदलून ते X करण्यात आलं आहे. यावरून सोशल मिडीयात अनेक मिम्स वायरल होत असताना आता त्यामध्ये अजून एका धम्माल किस्स्याची भर पडली आहे. सोशल मीडीयात एका पतीने त्याच्या पत्नीचा या ' X' वरून झालेला गोंधळ शेअर केला आहे. Alex Cohen ने ट्वीट शेअर करत हा प्रकार सांगितला आहे.

Alex Cohen या ट्वीटर युजरने ' X' चं सब्सस्क्रिप्शन घेतलं आहे. दरम्यान त्याचा व्यवहार पत्नीने पाहिला. तिने टेक्स्ट मेसेज करत त्याचा जबाब विचारला. Alex च्या पत्नीचा खरंतर गैरसमज झाला. ट्वीटर आता ' X'झालंय हा संदर्भ ती विसरली. आपला पती एखाद्या पॉर्न साईटच्या सब्सस्क्रिप्शन साठी पैसे भरत असल्याचा तिचा गैरसमज झाला आणि तिने त्याचा जबाब विचारला. बिचार्‍या पतीनेही त्यांचं हे चॅट जाहीर करत आता मला कोच वर झोपावं लागतयं असं म्हणत या किश्श्याची मज्जा घेतली. नेटकर्‍यांनी या ट्वीट वर प्रतिक्रिया देत या गोष्टीचा आनंद घेतला आहे. अनेकांनी हे ट्वीट रिट्वीट देखील केले आहे.

पहा ट्वीट

इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरच्या नावात बदल केला. मस्कने नोव्हेंबर 2022 मध्ये साइटचा ताबा घेतला आणि तेव्हापासून कंपनीच्या जवळपास निम्म्या कामगारांना कामावरून काढून टाकणे आणि लिंडा याकारिनो यांना सीईओ म्हणून नियुक्त करणे असे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ट्वीटर मधून कमाईत वाढ व्हावी यासाठी हे रिब्रॅन्डिंगचे प्रयत्न केले जात आहेत.