Elon Musk Renames Twitter To X: ट्विटरच्या अधिकृत हँडलवर (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. यासोबतच नाव बदलून X असे करण्यात आले आहे. मात्र, मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर आता X असा लोगो दिसत आहे. ट्विटरच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनीही ट्विट करून एक्स नावाची माहिती दिली. जुन्या लोगोमध्ये निळ्या रंगाचा पक्षी वापरण्यात आला होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करण्यात आले आहेत. पण नाव आणि लोगो बदलणे हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे. (वाचा - Twitter New Logo: 'X' घेणार ट्वीटरच्या चिमणीची जागा; Twitter Headquarters वर Elon Musk यांनी दाखवला नवा लोगो)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)