अनेक जणांसाठी त्यांचे पाळीव प्राणी (Pet Animals) हे कुटुंबातील इतर सदस्यांसारखे असतात. अशा प्राण्यांचे राहणे, खाणे, पिणे अगदी घरातील इतर सदस्यांप्रमाणे होत असते. काही लोक आपल्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या बिछान्यातही झोपवतात. कुत्रा आणि मांजर अशा प्राण्यांसोबत बेडवर झोपणे हे आपण समजू शकतो. परंतु एका अजगराला (Python) आपल्यासोबत घेऊन बेडवर झोपणे हा फारच धक्कादायक प्रकार आहे. कोणीही याची कल्पना करू शकणार नाही, परंतु हे सत्य आहे. Animal Channel मध्ये याबाबत एक बातमी प्रकाशित झाली होती.
एक महिला रोज रात्री एका महाकाय अजगरासोबत झोपायची. महत्वाचे म्हणजे अजगरही आपल्या मालकिणीला चिकटून झोपायचे. महिला पोटावर झोपली की अजगर महिलेच्या अंगावर अगदी डोक्यापासून पायापर्यंत पसरत असे. मालकिणीसाठी हा फार सुखद अनुभव होता. परंतु महिलेसोबत काही आठवडे राहिल्यानंतर अचानक अजगराने खाणेपिणे बंद केले. अजगराचे बदललेले वागणे पाहून महिलेला सापाची काळजी वाटू लागली. अजगर किंवा साप सामान्यतः अन्नाचा आनंद घेत असे, म्हणून या अजगराचे न खाणे फारच असामान्य होते. त्यानंतर ती या अजगराला घेऊन पशुवैद्याकडे गेली.
पशुवैद्याने या महिलेला सापाच्या नित्यक्रमाबद्दल विचारले आणि ते एकत्र झोपतात हे ऐकून त्याला धक्काच बसला. मग पशुवैद्यांनी रात्रीच्या वेळी सापाच्या स्थितीबद्दल विचारणा केली. महिलेने पशुवैद्यला सांगितले की, साप रात्रभर तिला चिकटून झोपत असते. यावेळी तो स्वतःला स्ट्रेचही करत असे. (हेही वाचा: Ghostly Experience: पत्नीच्या अंघोळीचा व्हिडिओ बनविणाऱ्या पतीला भूताटकीचा अनुभव)
हे एकूण नक्की काय घडत आहे पशुवैद्यकाला समजले व त्याने महिलेला समजावून सांगितले की, तिचा प्रिय अजगर तिला खाण्याची योजना आखत आहे, म्हणून स्वतःला स्ट्रेच करून आपला आकार वाढवत आहे. डॉक्टरांनी सांगितले की अजगर मालकिणीची लांबी मोजत आहे, जेणेकरून तो तिला सहज गिळू शकतो की नाही हे समजू शकेल. महाकाय अजगर हे साधारण मोठ्या मेजवानीसाठी आधीपासून तयारी करत असतात. त्याला आपल्या मालकिणीला खायचे होते, त्यामुळे त्याने काही दिवसांपासून इतर काही खाणे-पिणे सोडले होते. अजगर आपल्या मालकिणीला खाण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता.