सध्या सोशल मीडीयामध्ये अनेक जण व्हिडिओ शेअर करत आहेत ज्यामध्ये तिकीट नसलेले प्रवासी रिझर्व्हेशनच्या कोचमध्ये चढून प्रवास करतात. यामुळे अनेकांना गैरसोय होते. स्लीपर कोचपासून 3tier पर्यंत हाच प्रकार असतो. पण आता हा प्रकार AC 1st tier मध्येही घडला आहे. Sikkim Mahananda Express मधील एका महिला प्रवासीने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Swati Raj असं या प्रवासी महिलेचं नाव आहे. तिने X वर व्हिडिओ शेअर करत कमार्टमेंट मधील गर्दीचं वास्तव समोर आणलं आहे. तसेच प्रशासनाच्या देखील ही बाब लक्षात आणून तात्काळ कारवाईचं आवाहन केले होते. नक्की वाचा: भारतीय रेल्वे ने आणला नवा AC 3 Tier Economy Class Coach; पहा जगातला सर्वात स्वस्त, आरामदायी कोच आहे कसा?
पहा ट्वीट
This is the current situation of AC 1st tier in Mahananda 15483. I request management to check this immediately as we are not feeling safe when we are paying extra for it. @narendramodi @indianrailway__ @AshwiniVaishnaw pic.twitter.com/FwsKWhLCXF
— Swati Raj (@SwatiRaj9294) December 17, 2023
'ट्रेन मधील हा प्रकार असुरक्षित आहे. आम्ही यासाठी अधिकचे पैसे खर्च करतो त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.' असं तिने म्हटलं होतं.
स्वाती राजने दिलेल्या माहितीनुसार, 139 नंबर डाएल केला होता. त्यांचे कर्मचारी गर्दी दूर करण्यासाठी एका स्थानकावर आले परंतु थांबा फक्त दोन मिनिटांसाठी होता त्यामुळे ते आत येऊ शकले नाहीत.
मागील आठवड्यातही असाच प्रकार समोर आला होता. 12369 Kumbha Express मध्ये तिकीट नसलेले प्रवासी बर्थवर कब्जा करून बसल्याचे, प्रवाशांना त्रास देताना आणि अगदी आपत्कालीन साखळी ओढतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत.