Woman Slaps E-Rickshaw Driver: गाडीला थोडासा धक्का लागल्याने संतापली महिला; एका मिनिटात ई-रिक्षा चालकाला 17 वेळा मारली तोंडात; Watch Viral Video
Woman Slaps E-Rickshaw Driver (pc - Twitter)

Woman Slaps E-Rickshaw Driver: राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे ई-रिक्षा कारने बाजूने धडक दिल्याने एका महिलेचा संताप अनावर झाला. ई-रिक्षा चालकाला शिवीगाळ करताना महिलेने एका मिनिटात ई-रिक्षा चालकाला 17 वेळा चापट मारल्या. ही घटना नोएडाच्या फेज 2 मधील सेक्टर 110 मधील मार्केटची आहे. एका महिलेने रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रिक्षाचालकाला शिवीगाळ करत चापट मारत असल्याचे दिसत आहे.

या महिलेने एका मिनिटात रिक्षाचालकाला 17 चापट मारले. या मारामारीदरम्यान महिलेने रिक्षाचालकाचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक या महिलेवर टीका करत आहेत. अनेकांनी नोएडा पोलिसांना महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - Viral Video: धक्कादायक! प्रसुतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून थरारक प्रवास, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल)

विशेष म्हणजे या महिलेने रिक्षाचालकाला मारहाण करून त्याच्या खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले. तसेच तुझ्या बापाची गाडी आहे का? अशा शब्दांत महिलेने रिक्षाचालकाला धमकावले.