Woman Vulgar Dance Moves With PM Modi's Cutout: इंस्टाग्राम रीलसाठी सेल्फी पॉईंटवर महिलेने पंतप्रधान मोदींच्या कटआउटसमोर केला अश्लील डान्स, (Watch Video)
Woman Vulgar Dance Moves With PM Modi's Cutout (PC - X/@navalkant)

Woman Vulgar Dance Moves With PM Modi's Cutout: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला इंस्टाग्राम रील (Instagram Reel) बनवताना सेल्फी पॉइंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउट (PM Modi's Cutout) समोर डान्स (Dance) करताना दिसत आहे. केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे स्थानके, रेशन दुकाने आणि इतर ठिकाणांसह विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रांसह सेल्फी पॉइंट्स लावले आहेत. तथापि, इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की एक महिला इंस्टाग्राम रीलच्या गाण्यावर पंतप्रधानांच्या कटआउटसमोर अश्लील चाळे करत नाचताना दिसत आहे.

ही महिला बॉलीवूड गाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कटआउटसह अश्लील पद्धतीने नाचताना दिसत आहे. ही महिला व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 1993 च्या सुपरहिट चित्रपट खलनायक मधील "आजा सजन आजा" या बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला मोदींच्या कटआटला मिठी मारताना दिसत आहे. (हेही वाचा - बायकोसोबत Pre-Wedding Shoot करण्याच्या नादात डॉक्टरने गमावली सरकारी नोकरी)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, 15 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.