बायकोसोबत Pre-Wedding Shoot करण्याच्या नादात डॉक्टरने गमावली सरकारी नोकरी

कर्नाटक राज्यातील एका नवरदेवाला प्री-वेडिंग शूट करणे भलतेच महागात पडले आहे. बिच्चाऱ्यावर लग्नाआधी बायकोसोबत फोटोशूट करण्याच्या नादात नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या या तरुणास प्रशासनाने कारवाई करत नोकरीवरुन डच्चू दिला आहे. ही घटना चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या एका डॉक्टरसोबत घडली. नेमके काय घडले घ्या जाणून.

बायकोसोबत Pre-Wedding Shoot करण्याच्या नादात डॉक्टरने गमावली सरकारी नोकरी
Operation Theatre | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Pre-Wedding Shoot In Operation Theatre: लग्न ठरताच प्री-वेडिंग शूट करण्याची पद्धत अलिकडे जवळपास रुढच झाली आहे. त्यातील काही फोटो, व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात आणि टीकेचे धनी बणतात. अर्थात काहींचे कौतुक होते हा भाग वेगळा. पण, कर्नाटक राज्यातील एका नवरदेवाला प्री-वेडिंग शूट करणे भलतेच महागात पडले आहे. बिच्चाऱ्यावर लग्नाआधी बायकोसोबत फोटोशूट करण्याच्या नादात नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या या तरुणास प्रशासनाने कारवाई करत नोकरीवरुन डच्चू दिला आहे. ही घटना चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या एका डॉक्टरसोबत घडली. नेमके काय घडले घ्या जाणून.

ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट

तर झाले असे की, सरकारी रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर असलेला हा तरुण लग्न ठरताच भलताच उतावीळ झाला. पठ्ठाने प्री-वेडिंग शूट करायचे ठरवले. अर्थात यात मोठी गोष्ट नाही. पण त्याने जी जागा निवडली ती पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. होय, या शूटसाठी त्याने चक्क ऑपरेशन थिएटरच गाठले. त्याने चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन प्री-वेडिंग शूट केले. आता ते सरकारीच रुग्णालय. प्रश्न विचारणारे हजार लोक. त्यात त्याने केलेली कृती भलतीच गंभीर. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रकार कैद झाला आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला. वरिष्ठांची घटनेची दखल घेतली आणि चौकशी सुरु केली. (हेही वाचा, Bride Groom Viral Video: वधूला पाहून नवरदेव डोक्यावर उभा राहिला; Pre Wedding Shoot पाहून लोकांनी लावला डोक्याला हात)

प्री-वेडिंग शूट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वरिष्ठांनी केलेल्या चौकशीमध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहिले गेले. ज्यामध्ये डॉक्टर अभिषेक नावाचा तरुण, ज्याचे नुकतेच लग्न ठरले आहे आणि तो प्री-वेडिंग शूट करतो आहे असे स्पष्ट दिसले. व्हडिओत असेही पाहायला मिळाले की, हे लग्नाळू जोडपे ऑपरेशन थिएटरमध्ये व्यावसायिक उपकरणे वापरत आहे आणि शस्त्रक्रिया करतानाची नक्कल (अभिनय) करताना दिसत आहे. याचवेळी त्यांच्यात हास्यविनोदही सुरु आहेत. या धक्कादायक घटनेची दखल घेत प्रशासनाने कारवाई केली. (हेही वाचा, प्री वेडिंग फोटोशूट दरम्यान Kiss करताना कपल नदीत पडलं (Viral Video))

एक्स पोस्ट

दरम्यन, हा प्रकार सोशल मीडियातही व्हायरल झाला. ज्याची गांभीर्याने दखल घेत कर्नाटकचे आरोग्य मंत्री, दिनेश गुंडू राव यांनी तातडीने डॉ. अभिषेक यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले. तसेच, सरकारी रुग्णालये वैयक्तिक मनोरंजनासाठी नव्हे तर सार्वजनिक सेवेसाठी समर्पित आहेत असेही ते म्हणाले. एका एक्सपोस्टमध्ये, मंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले आणि सांगितले की सरकारी रुग्णालये केवळ सार्वजनिक आरोग्य सेवेच्या उद्देशाने उभारली आहेत. वैयक्तिक कृतींसाठी नाहीत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवा नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिनेश गुंडू राव यांनी दिला.

(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2024 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).