Winter Season Google Doodle:  Winter Solstice 2021 चं औचित्य साधत गूगल चं खास अ‍ॅनिमेटेड डूडल!
Winter 2021 | PC: Google.com Homepage

गूगल डूडल आज अ‍ॅनिमेटेड ग्राफिक्स सोबत Winter 2021 साजरं करत आहे. Hedgehog बर्फामधून पुढे जात असल्याचं यामध्ये पहायला मिळत आहे. 21 डिसेंबर हा दिवस Winter Solstice किंवा December solstice म्हणून देखील ओळखला जातो. आजचा दिवस हा सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असा असतो.

जगात युके, अमेरिका, कॅनडा, रशिया, भारत, चीन या देशांमध्ये जिथे प्रामुख्याने थंडीचा म्हणजेच हिवाळा ऋतू असतो तेथे 21 किंवा 22 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. उत्तरेकडील गोलार्धात सूर्य थेट विषुववृत्ताच्या 23.5 डिग्री दक्षिणेस मकरवृक्षाच्या उष्णकटिबंधीय भागावर येतो तेव्हा उत्तरायण प्रारंभास सुरुवात होते. पृथ्वीच्या अक्षांमधील ही झुकाव वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी सूर्याच्या ग्रहाच्या वेगवेगळ्या भागांचे अधिक प्रदर्शन करते. डिसेंबरमध्ये, पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून दूर जात असताना दक्षिणी गोलार्धात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अचूक वेळ दोन गोष्टींवर अवलंबून असते - भिन्न वेळ क्षेत्रातील अक्षांश आणि भौगोलिक स्थान.

Winter Solstice 2021 गूगल डुडल 

(हे देखील पहा: Spring Season 2020: 'वसंत ऋतु' 2020 आगमनाच्या निमित्त Google ने साकारलं कलरफूल डुडल!).

Winter Solstice हा सूर्यदेवाचा जन्मदिवस समजला जातो. आता हळूहळू दिवस मोठ होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते. वर्षातून दोनदा एकदा उत्तर ध्रुवावरील प्रदेशांसाठी तर दुसर्‍यांदा दक्षिण ध्रुवावरील प्रदेशातील लोकांसाठी Winter Solstice असतो. आजचा Winter Solstice हा उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशासाठी आहे.