Nagpur: व्हिडिओ शूट सुरू असताना दुचाकीस्वरांनी हिसकावला ब्लॉगर्सचा मोबाईल; पुढे काय झालं तुम्हीचं पहा, Watch Video
Nagpur Bloggers Viral Video (PC - Twitter)

Nagpur: इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर प्रत्येकजण रील किंवा शॉर्ट्स बनवत असतो. यामध्ये विविध प्रकारचा आशय पाहायला मिळतो. सध्या फूड व्लॉगचीही स्वतःची क्रेझ आहे. लोक असे व्हिडिओ पाहतात आणि सुट्टीच्या दिवशी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये असे व्हिडिओ शुट करण्यासाठी पोहोचतात. सध्या सोशल मीडियावर अशाचं स्वरुपाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नागपूरस्थित रुचिका असटकर तिच्या मैत्रिणी आणि बंगलोरमधील सहकारी ब्लॉगर्ससोबत असाच व्हिडिओ शूट करत होती. व्हिडिओ व्लॉग बनवण्यासाठी हे लोक 'गुफा रेस्टॉरंट'मध्ये पोहोचले. व्हिडिओ शूट सुरू असताना दोन मुले दुचाकीवरून आली आणि त्यांनी रुचिकाचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रुचिकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रुचिकाची मैत्रिण म्हणते, 'तुम्ही कधी गुहा रेस्टॉरंट ट्राय केलं आहे का?' यावेळी तिच्या मैत्रिणी 'ऐंवई, ऐंवई' हे गाणे गाऊन नाचत असतात. तेवढ्यात दोन मुले पिवळ्या आणि काळ्या बाईकवर येतात आणि तिचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने दुचाकीस्वरांचा हा प्रयत्न फसतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होतो. (हेही वाचा - Viral Video: विहीर मंजुरीसाठी लाच मागितल्याचा निषेध करताना, तरुण सरपंचाने उधळल्या दोन लाखाच्या नोटा)

या सर्व प्रकारानंतर चारही मुलींना धक्का बसतो. रुचिका ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “आम्ही गुफा रेस्टॉरंटच्या बाहेर उभे होतो आणि व्हिडिओ तयार करत होतो. हे 11:15 - 11:30 दरम्यान आहे. आम्ही ब्रँडसाठी व्हिडिओ बनवत सुमारे 20 मिनिटे तिथे होतो. आम्ही आमचा शेवटचा व्हिडिओ बनवत होतो, आम्ही ही घटना रेकॉर्ड केली."

रुचिका पुढे म्हणते की, "मी नुकताच माझा रिव्यू रेकॉर्ड केला आणि कॅमेरा माझ्या मैत्रिणींकडे वळवला. यावेळी माझ्या फोनवर ही घटना रेकॉर्ड झाली. आम्हाला वाटते की ते आमच्यावर लक्ष ठेवून होते. गुफा रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही घटना कैद झाली आहे. आमच्याकडेही (बाईकचा) नंबर आहे पण तो अगदी अस्पष्ट आहे. हा नंबर ट्रेस करता येईल की नाही याची आम्हाला खात्री नाही. पण रेस्टॉरंटमध्ये त्याची क्लिप आहे."

रुचिकाने तिच्या ट्विटमध्ये बंगळुरू पोलिसांना टॅग केले आहे. पोलिसांनी उत्तर देताना लिहिले की, "कृपया आम्हाला या प्रकरणाचे अचूक स्थान, तपशील आणि संपर्क क्रमांक पाठवा." पोलिस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.