Aadhaar Card ला लिंक केलेला मोबाईल नंबर नेमका कोणता? हे जाणून घेण्यासाठी uidai.gov.in वर फॉलो करा या स्टेप्स!
Mobile | (Images Used for Representational purposes only । Photo Credits: pixabay)

भारतामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी त्याचा वापर केला जातो. दरम्यान, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. मात्र आजकाल अनेकजण एकापेक्षा अधिक नंबर वापरत असल्याने नेमका कोणता नंबर आधार कार्डला लिंक केला आहे, हे लक्षात येत नाही आणि गोंधळ उडतो. पण तुम्हांला मोबाईल नंबर ठाऊक असेल तर अगदी घरबसल्या अनेक अपडेट्स करता येऊ शकता. यामध्ये पीव्हिसी कार्ड घेण्यापासून अगदी पत्ता बदलण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आधार कार्डसोबत नेमका कोणता मोबाईल नंबर रजिस्टर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पहा हे देखील घराबाहेर पडता घरच्या घरी पटकन कसं चेक कराल? जाणून घ्या. (नक्की वाचा: How To Change Mobile Number in Aadhaar: तुमच्या आधारकार्ड मधील मोबाईल क्रमांक कसा बदलाल? फॉलो करा या सोप्या टिप्स. )

UIDAI म्हणजे आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर आता अनेक गोष्टी सहज पाहण्याची, अपडेट करण्याची सोय आहे. यामध्ये तुम्हांला आता तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर देखिल पाहण्याची सोय उपलब्ध आहे. नक्की वाचा:  Update Aadhaar Address Online: घरबसल्या आधार कार्ड मध्ये पत्ता कसा अपडेट कराल?

आधार कार्ड सोबत तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे कसे पहाल?

  • uidai.gov.in या आधारकार्ड साठीच्या UIDAI वेबसाईटला भेट द्या.
  • verify the Aadhaar card services such as email and mobile number या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हांला विचारलेली माहिती नीट भरा.
  • मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका.
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका.
  • तुमच्या इमेलवर एक OTP पाठवला जाईल.
  • इमेल मध्ये आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या आधारकार्डाची सारी माहिती पहायला मिळेल यामध्ये मोबाईल नंबरचा देखील समावेश असेल.

त्यामुळे आता तुम्ही आधार कार्डवर नेमका कोणता मोबाईल दिला होता होता? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी डोकं खाजवत बसण्याची किंवा आधार केंद्रावर चकरा मारत बसण्याची मूळीच गरज नाही. घरबसल्या काही मिनिटात आता आधार कार्ड वरील रजिस्टर माहिती तुमच्यासमोर येऊ शकते. त्यासाठी वर दिलेली ही माहिती नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरेल.