How To Apply For Aadhaar PVC Card Online: आधार कार्ड ज्या आकारामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे ते सहज घेऊन फिरणं अनेकदा अशक्य असतं. पण प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. ओळखपत्र, निवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून ते ग्राह्य धरलं जात असल्याने अनेकांना सरकारी उपक्रमांचा, योजनांचा फायदा घेण्यापासून ते अगदी पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बॅंक अकाऊंटसोबत लिंक करणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून देखील आधार कार्ड वापरलं जात आहे ते नियमित तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. पण मूळ आधारकार्ड घेऊन फिरणं त्याच्या आकारामुळे कठीणही आहे आणि ते हरवल्यास पुन्हा पुन्हा अर्ज करणं म्हणजे कामात काम वाढवण्या सारखं आहे. पण आता UIDAI ने Polyvinyl Chloride म्हणजेच आधारकार्ड PVC कार्डमध्ये रिप्रिंट करण्याची परवानगी दिल्याने अनेकांना ते सोबत ठेवणं सुकर होणार आहे. PVC कार्ड स्वरूपातील आधार कार्ड हे आपल्या ATM किंवा डेबिट कार्ड प्रमाणे असल्याने ते सहज वॉलेटमध्ये ठेवता येऊ शकतं. नक्की वाचा: Aadhaar Card: काय तुमचे आधारकार्ड सुरक्षित आहे? येथे मिळवा संपूर्ण माहिती.
UIDAI ने नुकतंच ट्वीट करून देखील PVC कार्ड स्वरूपातील आधार कार्ड सुरक्षित आणि वॉलेटमध्ये ठेवणं , सोबत बाळगणं सोपं असल्याचं स्पष्ट केले आहे. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल नेमकं हे PVC कार्ड स्वरूपातील आधार कार्ड मिळणार कुठे? कसं? मग तुमच्या मनातील या सार्या प्रश्नांची उत्तरं खाली दिली आहेत. नक्की वाचा: Update Aadhaar Address Online: घरबसल्या आधार कार्ड मध्ये पत्ता कसा अपडेट कराल?
Aadhaar PVC Card ऑनलाईन कसं मिळवाल?
भारतीयांना आता PVC कार्ड स्वरूपातील आधार कार्ड घरबसल्या ऑर्डर करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि 50 रूपये शुल्क द्यावा लागणार आहे.
- UIDAI हे अधिकृत संकेतस्थळ उघडा.
- 'My Aadhaar section'मध्ये 'Order Aadhaar PVC Card'हा पर्याय निवडा.
- आता 12 अंकी आधार क्रमांक, 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाका.
- आता सिक्युरिटी कोड किंवा चित्रातील captcha टाका.
- Send OTP वर क्लिक करा.
- तुमच्या आधार सोबत रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
- OTP एंटर करून सबमीट बटण वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हांला तुमच्या PVC card चा प्रिव्ह्यू दाखवला जाईल.
- तो योग्य असल्याची खात्री केल्यानंतर पेमंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हांला ते पेमेंट पेजवर रिडिरेक्ट करतील.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमची Aadhaar PVC card ची ऑर्डर दिली जाईल.
You can now order the all-new Aadhaar PVC card, which is durable, looks attractive, and has the latest security features. Its security features include a hologram, Guilloche Pattern, ghost image & Microtext. To order, click https://t.co/TVsl6Xh1cX pic.twitter.com/FTNbOa5wE3
— Aadhaar (@UIDAI) October 10, 2020
PVC कार्ड स्वरूपातील आधार कार्ड हे टिकाऊ, दिसायला आकर्षक आहे. तसेच या कार्डमध्येही सुरक्षा पाळण्यात आली आहे. त्यात होलोग्राम, Guilloche Pattern,घोस्ट इमेज आणि मायक्रो टेस्ट आहे. त्यामुळे तुम्हांला रोज आधार कार्ड जवळ बाळगायचं असेल तर अशाप्रकारचं सुरक्षित कार्ड ऑर्डर करू शकता.