समुद्र प्रवास (Sea Travel) आणि सफर याचा आनंद कदाचीत खूप कमी लोकांनी घेतला असेल. पण ज्यांनी घेतला असेल त्यांना त्यातील मजा, आव्हान दोन्ही लक्षात येतील. सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यात समुद्रातून प्रवास करणाऱ्या एका बोटीवर व्हेल मासा (Whale Fish) कशी झेप (Whale Jumps on Boat Video) घेतो आणि बोटीवरील (Boat) प्रवाशांचे प्राण कसे थोडक्यात वाचतात याबाबत पाहायला मिळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाईक्स आणि प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळते की, एक नाव समुद्रात लांबवर आतमध्ये गेली आहे. बोटीवर काही प्रवासीही आहेत. दरम्यान, त्यांच्या जवळ एक भलामोठा व्हेल मासा पोहोचतो. हा मासा बोटीच्या दिशेने हवेत इतक्या वेगाने सूर मारतो की, पाहणाराही काही काळ स्थब्द होतो. बोटीवरील प्रवाशांची वेळ चांगली. नाहीतर हा मासा एक तर बोटीवर आदळला असता किंवा एखाद्या प्रवाशाला घेऊन तो समुद्रातही परतू शकला असता. शिवाय एक मोठा अनर्थही घडला असता. (हेही वाचा, Bull Jumps Viral Video: वळूची हवेत उडी, अनकांनी म्हटले व्वा! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)
व्हिडिओ
View this post on Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर oceanlife.4u नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओपाहून लक्षात येते की समुद्रातील सफर किती रोमांचक होते. पण, हाच रोमांच कधीकधी तुमच्या जीवावरही बेतू शकतो. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, हे दृश्य कोणालाही घाबरवू शकते.