कोलकाता (Kolkata) येथील एका शाळेत चक्क बैल (Bull) घुसला. या बैलाने शालेय आवारात जवळपास दोन तास धुडगुस घातला. अखेर मोठ्या प्रयत्नाने शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकून लावले. ही घटना कोलकाता येथील एका कन्याशाळेत (Girls School) घडली. मॉडर्न हायस्कूल फॉर गर्ल (Modern High School for Girls) असे या शाळेच नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (5 जून) दुपारी ही घटना घडली. शाळेत बैल घुसल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. सुरुवातील शाळेतील कर्मचाऱ्यांनी बैलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू, हा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे मग पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही प्रयत्न केला परंतू, बैलाला हुसकावण्यात पोलिसांनाही फारसे यश आले नाही. अखेर बैलला शालेय आवाराबाहेर काढण्यासाठी एक युक्ती करण्यात आली. त्यासाठी एका गायीला शालेय आवारात आणण्यात आले.
शाळेत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे शाळेचे फाटक उघडे ठेवण्यात आले होते. त्याचा फायदा घेऊन बैलाने कदाचित शालेय आवारात प्रवेश केला. द्वारपालाने बैलाला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. बैलासोबत झालेल्या झटापटीत द्वारापालास किरकोळ जखमाही झाल्या असल्याचे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे. (हेही वाचा, Bull Jumps Viral Video: वळूची हवेत उडी, अनकांनी म्हटले व्वा! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)
शाळेच्या आवारात बैल जेव्हा घुसला तेव्हा काही विद्यार्थीनी मैदानावर खेळत होत्या. अशा वेळी शाळेत बैल घुसताच त्यांची घाबरुन पळापळ झाली. शालेय कर्मचाऱ्यांनी बैलला हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्याला यश आले नाही. शेवटी पोलिसांना बोलवावे लागले.
पोलिसांनी सुरुवातीला बैलाला खायला देऊन पिटाळण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. शेवटी कासरा लावूनही बैलाला पकडण्याच प्रयत्न झाला. त्यालाही यश आले नाही. शरीराने अवाढव्य वाढलेला हा वळू शाळेच्या आवाराबाहेर काढणे हे भलतेच कठीण होऊन बसले होते.
शेवटी बैलाला बाहेर काढण्यासाठी युक्तीचा वापर करण्यात आला. बैलाला अमिश दाखविण्यासाठी एक गाय शाळेच्या आवारात आणण्यात आली. गायीला पाहताच बैल धावून आला. अखेर गईला हळूहळू फाटकातून बाहेर नेण्यात आले. तिच्यापाठोपाठ बैलही चालता झाला. ही घटना दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. बैल बाहेर जाताच शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी आणि पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. गाईला एका वाहनात भरुन तिच्या मूळ ठिकाणी सोडण्या आले.