Weekend Lockdown Funny Memes and Jokes: विकेंड लॉकडाऊन वरील फनी मीम्स आणि जोक्स शेअर करत नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
Weekend Lockdown Funny Memes and Jokes (Photo Credits: Twitter)

देशात कोरोना व्हायरसची दुसऱ्या लाट (Coronavirus Second Wave) वेगाने पसरत आहे. दिवसागणित कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. ही लाट थोपवण्यासाठी देशाच्या विविध राज्यांमध्ये विकेंड लॉकडाऊन (Lockdown), नाईट कर्फ्यू (Night Curfew) यांसारखे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरुनच आता सोशल मीडियात (Social Media) फनी मीम्स आणि जोक्सला (Funny Memes & Jokes) उधाण आले आहे. नेटकऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनबद्दलच्या भावना मीम्सच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.

कोणत्याही घटनेवर, व्यक्तीवर, व्यक्तीच्या वक्तव्यावर मीम्स बनवले जातात. क्रिएटीव्ह असे हे फनी मीम्स सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. एखाद्या गंभीर घटनेवरील मीम्स देखील सोशल मीडियात व्हायरल केले जातात. या ट्रेंड विकेंड लॉकडाऊनच्या निर्णयानंतरही दिसून येत आहे. मागील वर्षी देखील कोविड-19 लॉकडाऊन, अनलॉकच्या टप्प्यात अनेक मीम्स व्हायरल झाले होते. (Lockdown Extension Funny Memes and Jokes: लॉकडाऊन वाढवल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल!)

विकेंड लॉकडाऊन फनी मीम्स आणि जोक्स:

दरम्यान, कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी आहे. तर देशाच्या विविध राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.