Lockdown Extension Funny Memes and Jokes: लॉकडाऊन वाढवल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल!
Lockdown Extension Funny Memes (Photo Credits: @punjabiii_munda/ @__Sankii__/ Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह अन्य राज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवला आहे. तसंच अनलॉक 3 (Unlock 3) ला देखील सुरुवात होणार आहे. अनलॉक 3 अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम कडक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कालच राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची बातमी समोर आली आणि अनलॉक 3 ची नवी नियमावली जारी करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर यावरील मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील लॉकडाऊन वाढल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्स (Memes & Jokes) प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. (अनलॉक 1 वर सोशल मीडियात भन्नाट मीम्सचा पाऊस!)

दरम्यान भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 15 लाखांच्या पार गेला असून आतापर्यंत कोविड-19 संसर्गामुळे तब्बल 34 हजार 968 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 24 मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली. 31 मे पर्यंत लॉकडाऊनची बंधने अगदी कडक होती. त्यानंतर जून पासून देश अनलॉक व्हायला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये देशात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून अनेक नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. तर लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

व्हायरल मीम्स:

आता आपल्याला लॉकडाऊन काही नवा राहिलेला नाही. गेल्या चार-पाच महिन्यांपासून आपण लॉकडाऊनचा अनुभव घेत आहोत. मात्र देशातील दिवसागणित वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका. तसंच काही आवश्यक कारणांसाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर अवश्य करा.