मुंबई: IPL 12 मधील मुंबई इंडियन्स च्या विजयाचा जल्लोष चक्क लग्नसोहळ्यातही; लग्नाचे विधी सोडून बॅन्ड बाजावर थिरकले वर्‍हाडी (Watch Video)
IPL Final In Wedding Reception (Photo credits: You Tube)

क्रिकेट आणि त्यातही T20 प्रकारच्या क्रिकेटचे चाहते असणार्‍यांसाठी 12 मे 2019 ही तारीख महत्त्वाची होती. मुंबईमध्ये एका जोडप्याच्या लग्नात ही तारीख अजूनच खास बनली आहे कारण चक्क एका विवाहसोहळ्यात काही काळ लग्नाचे विधी बाजूला ठेवत वर्‍हाडी मंडळींचं लक्ष आयपीएल 12 च्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्याकडे लागले होते. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे.

आयपीएल च्या 12 व्या सीझनची काल (12 मे) दिवशी फायनल होती. मुंबई इंडियंस विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्स या संघांमध्ये अंतिम सामना रंगला. शेवटच्या बॉलपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडियंसने बाजी मारली. IPL 2019 चे विजेतेपद पटकवल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाची सेलिब्रेशन सफर

 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्न सोहळ्यात आयपीएल 12 चा अंतिम सामना खास स्क्रिनवर दाखवण्यात आला.हा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबईत एका लग्न सोहळ्यात स्टेजजवळच स्क्रीन लावण्यात आली होती. त्यावर मुंबई विरूद्ध चेन्नईचा अंतिम सामना दाखवण्यात आला. शेवटी एका धावेने चैन्नईवर मुंबई संघाने मात केल्यानंतर वर्‍हाडींनीदेखील जल्लोष केला.

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशंल स्टेडियमवर आयपीएल 12 चा अंतिम सामना पार पडला. मुंबई इंडियंस संघाने चौथ्यांदा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली विजेतेपद पटकावलं आहे.