महिलांनो लिफ्टमधून एकट्याच जात असाल तर, हा व्हिडिओ पाहाच
Woman thrashed, robbed inside lift (Photo Credits: YouTube Video)

सोशल मीडियावर व्हायरल Viral Video) झालेला हा व्हिडिओ राजधानी दिल्लीतील असल्याचे सांगितले जात आहे. परंतू, प्राप्त माहितीनुसार हा व्हिडिओ मलेशीया (Malaysia) येथील एका मेट्रो स्टेशन लिफ्ट (Metro Station Lift)मधील आहे. या व्हिडिओतील घटना नेमकी कोठे घडली याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, व्हिडिओत जे दिसते ते काळजाचा थरकाप उडवणारे आहे. हा व्हिडिओ कदाचित आपल्या भावनांवर परिणाम करु शकतो. तुम्ही जर एकट्याने लिफ्टमधून जात करत असाल तर, सावधान! खास करुन अनोळखी व्यक्तीसोबत. या व्हिडिओतील घटना केवळ महिलाच नव्हे तर, कोणत्याही व्यक्तीने लिफ्टमधून एकट्याने जाताना काळजी घ्यायला हवी असेच सूचित करणारा आहे.

व्हिडिओत दिसते की, एक महिला/मुलगी लिफ्टमधून जात आहे. दरम्यान, तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्तिही लिफ्टमध्ये प्रवेश करतो. लिफ्ट सुरु होताच हा व्यक्ती अगदी त्वेशाने या महिलेवर हल्ला करतो. तिला इत्यंत निर्दयीपणे मारहाण करुन तिची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्यक्ती इतका बेभान झाला आहे की, तो कशा पद्धीतीने मारहाण करतो आहे याचेही त्याला भान नाही. (हेही कारभारीsss दमानं... सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचा नर्तिकेसोबत नृत्याचा तडका; व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, पीडितेच्या पर्समधील पैसे घेऊन हा व्यक्ती घटनास्थळावरुन पोबारा करताना दिसतो. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. सीसीटीव्हीतील हे फुटेज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणही लिफ्टमधून एटक्याने जात असताना जरुर काळजी घ्या. लेटेट्सली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.