कारभारीsss दमानं... सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचा नर्तिकेसोबत नृत्याचा तडका; व्हिडिओ व्हायरल
Retired Naib Tehsildar's Dance video viral in Agriculture program at Amravati | (Photo credits: Facebook Video Screen Shot, Edit Image)

Retired Naib Tehsildar's Dance video at Amravati: कारभारी दमानं...! (Karbhari Daman Lavani) ही लोकप्रिय लावणी आणि तिचा डोलकीचा ठेका अनेकांना थिरकायला लावतो. जाहीर कार्यक्रम असो किंवा खासगी बैठक अथवा बार कारभारी दमानं.. ही लावणी होणारच. ही लावणी सादर करायला मंचावर नर्तिका आली रे आली की, अनेकांचा कलेजा खलास होतो. ते थिरकायला लागतात. अमरावती येथील एका कृषी विकास परिषद कार्यक्रमात मात्र एका सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना (Retired Naib Tehsildar) रहावले नाही. ते जागेवर थिकरण्याऐवजी हळूहळू मंचाकडे सरकले. आणि पाहता पाहता त्यांनी कारभारी दमानं.. गाण्यावर नृत्य करणाऱ्या नर्तिकेला साद घातली आणि तिच्यासोबत ठेका धरला. नायब तहसीलदार साहेबांच्या या हटके नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राष्ट्रीय कृषी विकास परिषद आयोजित केली होती. ही परिषद 8 ते 11 फेब्रुवारी अशी चार दिवस चालली. दरम्यान, या परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या लोककला दंडार या सास्कृतीक कार्यक्रमात औचित्यभंगाचा प्रकार घडला. लोककला दंडार या कार्यक्रमात महिलांची वेशभुषा करुन पुरुष नृत्य करत असतात. तसेच, द्विअर्थीय संवादाच्या माध्यमातून सामाजिक विषयावार इथे भाष्य केले जात असल्याचेही समजते. (हेही वाचा, २७२ किलो वजनाच्या महिलेने घटवले वजन; अनोखा एक्सरसाईज व्हिडिओ व्हायरल, फिटनेस गुरुंनही जोडले हात)

दरम्यान, कार्यक्रमात कारभारी दमानं या गाण्यावर एक कलाकार नृत्य करत होता. कारभारी दमानं असे या गाण्याचे (लावणी) बोल होते. हे गाणे सर्व महाराष्ट्राला परिचीत आहे. या गाण्यावर नृत्य सुरु असतानाच निवृत्त नायाब तहसीलदार मंजावर गेले आणि त्यांनी कलाकारासोबत उपस्थितांना नृत्याची मेजवाणी दिली. मात्र, हा प्रकार तहसीलदारांसह आयोजकांनाही महागात पडल्याचे चित्र आहे. कारण, या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एका शासकीय कार्यक्रमात दंडारसारखे कार्यक्रम का घ्यावा असा सवाल विचारला जात आहे.