Viral: लग्नासाठी तरुणाने संपूर्ण शहरात होर्डिंग्स लावत लिहिली 'अशी' गोष्ट, लोक ही वाचून चक्रावले
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

भारतात बहुतांश लोक अरेंज मॅरेज करतात. मात्र आता लव्ह मॅरेज करण्याला सुद्धा आता घरातील मंडळींकडून परवानगी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड मधील एका तरुणाने अरेंज मॅरेज पासून बचाव करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. त्याच्या या युक्तीची आता सध्या जोरदार चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. तरुणाने अरेंज मॅरेज पासून दूर राहण्यासाठी त्याने संपूर्ण शहरात होर्डिंग्स लावले. या होर्डिंग्सवर त्याने 'कृपया मला अरेंज मॅरेज करण्यापासून वाचवा' असे लिहिले आहे. हे वाचून लोक ही चक्रावले आहेत.

हे होर्डिंग्स पाहून असे वाटते की, तरुणाच्या घरातील मंडळीच्या त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न करत आहेत. त्यामुळेच त्याने अशा प्रकारचे होर्डिंग्स लावले आहेत. परंतु असे काही नसून त्यामागील कारण थोडे वेगळे आहे. खरंतर एका लग्नाची जाहिरात करण्यासाठी हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. UK मधील बर्मिंघम शहरात विविध ठिकाणी ते लावले आहेत.(Viral Video: विशालकाय अजगरासोबत मुक्तपणे खेळणाऱ्या मुलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? Watch It)

मोहम्मद मलिक असे तरुणाचे नाव आहे. त्याचे वय 29 वर्ष असून त्याने त्याच्या लग्नासाठी चक्क एक वेबसाइट सुद्धा तयार केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून सिंगल असलेल्या तरुणींना त्याच्या पर्यंत पोहचू शकतात. तरुणाने होर्डिंग्सवर आपले छान फोटोंसह गोंडस मुलीच्या शोधात असल्याचा एक मेसेज सुद्धा लिहिला आहे.

मोहम्मद हा लंडन येथे राहतो आणि बर्मिघम हे त्याचे दुसरे घर असल्याचे तो मानतो. त्याने लावलेल्या होर्डिंग्सची उंची 20 फूट आहे. मोहम्मद हा व्यवसायाने इनोव्हेशन कन्सल्टंट आणि उद्योजक आहे. त्याचे अनेक होर्डिंग शहरात पाहायला मिळतात. Findmailkawife.com असे त्याने तयार केलेल्या वेबसाइटचे नाव आहे. त्यांच्याबद्दलची सर्व माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे.