Viral Video: हत्तीला पाहून शिकारी वाघाची अवस्था बिघडली, हत्तीला पाहून लपला झुडपात (पाहा व्हायरल व्हिडिओ)
The condition of the hunting tiger deteriorated after seeing the elephant

Viral Video: जंगलात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता अशा भक्षक प्राण्यांची भीती इतर प्राण्यांना असते, मात्र या वनविश्वात हत्तींचा स्वतःचा दबदबा आहे. शांतताप्रिय हत्तींना त्यांच्या कुटुंबासोबत शांततेने राहायला आवडते, पण त्यांना राग आला तर शक्तिशाली प्राणीही त्यांच्या रागापुढे  मांजरासारखे होतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ पहायला मिळत आहे, ज्यामध्ये हत्तींना पाहून शिकारी वाघाची अवस्था इतकी बिघडते की, वाघ हत्ती पासून  वाचण्यासाठी झुडपात पळतो. हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. wildtrails.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे- आदर...

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by WildTrails.in (@wildtrails.in)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक वाघ जंगलात भक्ष्याच्या शोधात फिरत आहे, पण तेवढ्यात त्याला हत्ती येण्याचा आवाज येतो आणि तो पळत सुटतो आणि हत्ती येण्याआधीच झुडपात लपतो. हत्ती दुसऱ्या बाजूला सरकताच वाघ झुडपातून बाहेर येतो.