Viral Video: भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात ही मोठी समस्या बनत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एका बैलाने महिलेवर हल्ला केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावरून चालत असताना एक बैल अचानक महिलेवर हल्ला करतो, त्यामुळे ती रस्त्यावर पडली. रस्त्यावरून जाणारे आणि आजूबाजूचे लोक तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि एका व्यक्तीने प्राण्याची शिंगे धरून महिलेला सुरक्षित ठेवण्यास मदत केली. हे दृश्य पाहून लोक संतापले, कारण दिल्लीत अशा घटना सर्रास घडत आहेत. दिल्लीतील बेकायदा डेअरींच्या समस्येमुळे भटक्या जनावरांच्या समस्येलाही वाढ होत आहे. अशा डेअरी रहिवासी भागात सुरू असून, तेथून घाण आणि जनावरांचा कचरा गटार आणि नाल्यांमध्ये टाकला जातो. हे देखील वाचा: Pollution Increases in Winter: हिवाळ्यात वाढतो प्रदूषणाचा कहर, नागरिकांनी कशी घ्यावी काळजी, जाणून घ्या
तोडगा काढण्याची मागणी आणि कठोर कारवाईची गरज
🚨हादसों का शहर!
देश की राजधानी दिल्ली!
राष्ट्रीय राजधानी दिल्ली में 🐂आवारा मवेशी के कारण एक और दुर्घटना हुई। समस्या विकराल होने के बाद भी समाधान इसलिए नहीं हो पा रहा है, क्योंकि निगम के स्थानीय अधिकारियों से लेकर पुलिस और प्रशासन की मिलीभगत से रिहायशी क्षेत्रों में… https://t.co/ycdxZF6C3H pic.twitter.com/doshDdBoar
— Delhi Complaint (@DelhiComplaint) November 5, 2024
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जनतेला आता या समस्येवर तोडगा हवा आहे आणि भटक्या प्राण्यांची समस्या मुळापासून दूर करण्याची मागणी केली जात आहे.