Viral Video: लोकवस्तीत वाघाने फोडली डरकाळी, सुंदरबन येथील हैराण करणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Viral Video: जंगलातील जनावरांचे हैराण करणारे व्हिडिओ बहुधा समोर येत असतात. हे व्हिडिओ सोशल मीडियात सुद्धा काही वेळा तुफान व्हायरल झाल्याचे दिसून आले आहेत. काही वेळा जंगली प्राणी हे मानवी वस्तीत शिरत लोकांचा थरकापच उडवतात. याच पार्श्वभुमीवर सुंदरबन मधील वाघाचा एक व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे. यामध्ये एक वाघ लोकवस्तीत आला असून त्याला पाहून लोकांची घाबरगुंडी झाली आहे. हाच व्हिडिओ सोशल मीडियात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पहाल तर तुमच्या सुद्धा भुवया आपोआप उंचावल्या जातील.

व्हायरल झालेला व्हिडिओ फोटोग्राफर Soumyajit Nandy याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच 700 हून अधिक याला लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, हा नजारा खरच धक्कादायक आहे. येथे राहणाऱ्या लोकांना सलाम. तर अन्य एका युजर्सने लिहिले की, नशीब तेथे एक जाळी होती.(Pink Dolphin Viral Video: समुद्रात दिसला गुलाबी रंगाचा डॉल्फिन; पहा विलोभनीय दृश्यं)

 

View this post on Instagram

 

A post shared by Soumyajit Nandy (@swamptigerchaser)

व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, एक वाघ लोकवस्ती जवळ आला आहे. तेथे असलेल्या लोकांवर हल्ला करु पाहत आहे. वाघ जाळीवर आपला जोर लावून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचसोबत त्याची डरकाळी ऐकून लोक घाबरली आहेत. मात्र लोकांनी न घाबरता त्याला तेथून पळवून लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सुंदरबन मधील हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.