Viral Video Of Propose | (PC - You Tube)

नववर्षाच्या पार्टीत (New Year’s Eve party in Hawaii) लग्नाबाबत विचारणाऱ्या प्रियकराला नकार देणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रसंग हवाई येथे घडल्याचे सांगितले जात आहे. नववर्षाच्या पार्टीमध्ये सुरु असलेले संगीत अचानक बंद होते. तेव्हाच महिलेला अंदाज आला होता. इतक्यात तिच्या बॉयफ्रेंडने तिला स्टेजवर बोलावले आणि प्रपोज केले. काहीशा अनिच्छेनेच तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि ती त्याच्यासोबत पार्टीत सहभागी झाली. या घटनेचा एक टीकटॉक व्हिडिओ (TikTok Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीक टॉक युजर Cass याने @caesthetically हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, 31 डिसेंबर 2022 रोजी वायकिकी, हवाई येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित पार्टीमध्ये ही घटना घडली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टीकटॉकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओचा हवाला देत अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. त्यांनी व्हिडिओही शेअर केला आहे. दरम्यान, भारतामध्ये टीकटॉकला बंदी आहे. परिणामी आम्ही आम्हाला हा व्हिडिओ येथे देता येत नाही. (हेही वाचा, Funny Wedding Video: 'वावर हाय तर पावर हाय', एकदोन नव्हे 51 ट्रॅक्टर घेऊन नवरदेव पोहोचला मांडवात, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची चर्चा)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडिओत पाहायला मिळते की, नवीन वर्ष आणि हवाई त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याबद्दल एक व्यक्ती भाषण देताना व्हिडिओत पाहायला मिळतो.दरम्यान, अचानक पार्टीतील संगीत बंद होते आणि हा व्यक्ती आपल्या प्रेयसीचे नाव घेतो. तो तिला स्टेजवर बोलवून चक्क प्रपोज करत म्हणतो “आणि मला सांगायचे आहे की मी तुझ्या प्रेमात वेडा आहे. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस."

ट्विट

दरम्यान, संबंधित व्यक्ती गुडघ्यावर खाली बसतो आणि त्या महिलेला तिच्याशी विवाह करु इच्छित असल्याचे सांगतो. दरम्यान, हा व्हिडिओ कट होतो. व्हडिओ दुसऱ्या अँगलने पाहिल्यास जो जोडप्यामध्ये एक विचित्र शांतता स्पष्ट दिसते. शेवटी तो व्यक्तीच या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असेच आहे, असे हसत सांगतो आणि निर्माण झालेली शांतता काहीशी दुर करतो. दरम्यान, खाली प्रेक्षांमधून एक व्यक्ती 'सो ऑक्वर्ड' असे ओरडतानाही दिसतो.