जंगलाचा राजा 'सिंह' जेव्हा गुजरातच्या जूनागढ मध्ये हॉटेलच्या परिसरात आला... पहा या थरारक क्षणाचा व्हिडिओ (Watch Video)
Lion Strolling in Hotel at Junagadh| Photo Credits: Twitter/Udayan Kachchhi

जंगलाचा राजा सिंह (Lion) हा अगदी रूबाबदार प्राणी आहे. पण सध्या सोशल मीडियामध्ये हाच सिंह त्याचं जंगल सोडून एका हॉटेलच्या परिसरामध्ये वावरताना दिसला आहे. सध्या हॉटेल परिसरामधील सिंहाच्या टेहाळणीच्या व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान ही घटना 8 फेब्रुवारी 2021 असून तो गुजरातच्या (Gujrat) जुनागढ (Junagarh) परिसरामध्ये टेहाळताना दिसला आहे. Udayan Kachchhi या ट्वीटर युजरने सिंहाच्या हॉटेल परिसरातील वावराचे 3 व्हिडिओ शेअर केले आहे. दरम्यान यामध्ये भारदस्त सिंह हॉटेल परिसरातून रस्त्यावर फिरताना दिसला आहे. गुजरात मधील माधवपूर गावातून सिंहाची भरधाव रपेट; पहा Viral Video.

मीडीया रिपोर्ट्सनुसार ही घटना गुजरातच्या जुनागढ मधील Hotel Sarovar Portico मधील आहे. जुनागढ मध्ये आता सिंहांचं येणं-जाणं सामान्य बाब आहे असे उदयन यांनी ट्वीट करत म्हटले आहे. दरम्यान व्हिडिओत हॉटेल बाहेर असलेल्या सिक्युरिटी गार्डच्या केबिनमध्ये असलेली व्यक्ती देखील सिंहाला बघून अचंबित झालेली पहायला मिळाली आहे. साधारण पहाटे 5 च्या सुमारास अचानक सिंह हॉटेल परिसरात आला. त्यानंतर त्याने उडी मारून गेट ओलांडला. रस्त्यावर गेलेला सिंह परत आला आणि नंतर तो एन्टरन्सच्या मार्गाने निघून घेण्याचं फूटेज सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

जेव्हा हॉटेल परिसरात सिंह वावरतो

गीरनार हिल्सच्या पायथ्याशी असलेले जूनागढ हे गीर लायन सेंचुरीच्या जवळ आहे. दरम्यान अशाप्रकारे रस्त्यांवर सिंहांचा वावर असल्याचा हा पहिलाच प्रकार नव्हे यापूर्वी देखील अशाप्रकारे सिंह रस्त्यावर फिरताना आढळले आहे. 2019 मध्ये 7 सिंहांचा कळप फिरताना दिसला होता. अनेक वाहनांवरही सिंह बसलेले पहायला मिळतात. सिंह गावामध्ये काही पाळीव प्राण्यांना आपला शिकार बनवतात.