Viral Video of Donkey: गाढव प्रेम पाहिलंत का? गाढवाला कडेवर घेतले, त्याच्यासाठी अंगाई गीत गायले; 'ऐकावे ते नवलच' वाटावे असा हा व्हिडिओ
Donkey Love | (Photo- Instagram)

'गाढवी प्रेम' (Donkey Love) ही खरेतर बोली भाषेतील एक म्हण. पण कधी कधी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या गोष्टी पाहिले तर त्याचा वास्तवाशी गाढा संबंध पुन्हा एकदा सिद्ध होतो. कधी तो सकारात्मक कधी नकारात्मक. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Donkey) झाला आहे. ज्यातून एका व्यक्तीचे गाढव प्रेम समोर आले आहे. एका व्यक्तीने चक्क छोट्या गाढवाला कडेवर घेतल्याचे या व्हिडिओत पाहयाला मिळते. इतकेच नव्हे तर हो व्यक्ती त्या गाढवाला अंगाईगीत (Lullaby) म्हणून झोपवतानाही दिसतो आहे. जसे आपण एखाद्या लहान मुलाला झोपवतो.

सोशल मीडियावर व्हयरल झालेल्या या व्हिडिओने अनेकांच्या चेहऱ्यावर हस्य उमटवले आहे. कदाचित आपल्यालाही हा व्हिडिओ आवडू शकेल. आपण सर्वांनी पशू आणि प्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे असेच सांगणारा काहीसा हा व्हिडिओ. प्राण्यांवर प्रेम करणारे खूप लोक आढळतील. मग हे लोक कधी घोडा पाळतात, कधी कुत्रा किंवा तत्सम प्राणी. पण गाढवांवर प्रेम करणारी मंडळी क्वचितच आढळतात.

गाढव प्रेमाचा हा व्हिडिो mrdonkers नामक एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोब एक कॅप्शनही लिहीली आहे. 'माझी आवडती छोटी मुलगी रेली' असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. व्हिडिओची सुरुवातच एका व्यक्तिपासून होते. ज्याच्या कडेवर एक छोटे गाढव आहे. एका गाढवाला गळ्यात घेऊन झोपवताना क्वचितच कोणी पाहिले असेल. त्यातही अंगाई गित गाऊन झोपवताना. (हेही वाचा, काय सांगता? Pakistan च्या अर्थव्यवस्थेला चक्क गाढवांमुळे चालना; Donkey लोकसंख्या पोहोचली 56 लाखावर)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr Donkers (@mrdonkers)

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला हे वृत्त लिहिपर्यंत 42,874 जणांनी पाहिले होते. व्हिडिओवर लाईक, शेअर आणि कॉमेंट करणारांची संख्याही मोठी आहे. एका युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे की, 'ओह माय गुडनेस, प्यारी नन्ही रेली..' आणखी एका युजर्सने म्हटले आहे की, हा तर जगातला सर्वात चांगला गाढव.